न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर योद्ध्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचे आभार मानण्याचे जनतेला आवाहन केलं होतं. या आवाहनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही टाळ्या वाजवून समाजरक्षकांना पाठींबा दर्शविला.

पिंपरी चिंचवड शहरात ठीक पाच वाजले अनं जनता कर्फ्यूत सहभागी नागरिकांनी, जेष्ठांनी, महिलांनी व लहान मुलांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून करोना पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांना, कर्मचाऱ्यांना समर्थन देत, कृतज्ञता दर्शविली व ‘ गो कोरोना ‘ ची घोषणा केली.














