न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या १८१ वर गेली आहे. मात्र, याउलट जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये घटल्याचे दिसून येत होते. परंतु, दोन दिवसांच्या विरामानंतर शनिवारी (दि. २८) रोजी एकाच दिवशी चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
हे तीनही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात गेल्या १५ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३७ वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यात आतापर्यंत सुमारे ९७५ करोना संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९५७ संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत ३७ संशयिताना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या प्रशासनाच्या विलीनीकरण कक्षामध्ये ५० संशयित व्यक्तीवर उपचार सुरु आहे.