न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- राज्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. मंगळवारी आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आणखी नवीन पाच करोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
यात मुंबईत १, पुण्यात २ तर बुलढाण्यात २ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातील आकडा २२५ वर पोहोचला आहे. देशात काल एका दिेवसात २२७ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार ५२१ झाली आहे.


















