न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२०) :- महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे.
करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. देशातली करोनाग्रस्तांची संख्या १६०० च्या वर गेली आहे. यामधले सर्वाधिक ३३५ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.


















