न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२०) :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी चिंचवड शहरातदेखील १२ रुग्ण कोरोनग्रस्त आढळले आहेत. नागरिक संचारबंदितही तीन फुटांचे सुरक्षित अंतर न राखता गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो.
गर्दी होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पिंपरीतील अनधिकृत भाजी मंडईतील गाड्यांवर आज बुधवारी (दि. १) रोजी कारवाई केली.


















