- सेवाभावी तत्वावर काम करणाऱ्या एनजीओंनी महापालिकेशी संपर्क साधावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- घराबाहेर जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना अन्न, औषधे व इतर आवश्यक सेवा सुविधा NGO (अशासकीय संस्था) च्यामदतीने उपलब्ध करून देण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सारथी हेल्पलाईन मोबाईल क्रमांक 8888006666 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याकामी महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे NGO (अशासकीय संस्था) ची नेमणूक करावयाची आहे. तरी, सेवाभावी तत्वावर अशा प्रकारचे काम करण्याची तयारी असलेल्या NGO (अशासकीय संस्था) यांनी उल्हास जगताप, नोडल अधिकारी तथा नगरसचिव/सहाय्यक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेशी मोबाईल क्रमांक 9922501255 यावरसंपर्क साधावा अथवा इमेल आय डी u.jagtap@pcmcindia.gov.in/nagarvasti@pcmcindia.gov.in यावर दिनांक ०४/०४/२०२० पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संतोष पाटील यांनी केले आहे.












