न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन चालू आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या गरजू पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग (अंध/अस्थिव्यंग), मजूर, कामगार, जेष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना घरपोच मोफत भोजन देण्यासाठी जनकल्याण समिती व श्री काळभैरवनाथ उत्सव समिती या स्वयंसेवी संस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयातून कार्यरत आहेत.
शहरातील गरजूंना याचा लाभ देण्यात येणार असल्याने अशा गरजू व्यक्तींनी चिंचवडसाठी ९५५२५७८७२६, भोसरीसाठी ८६०५७२२७७७, आकुर्डीसाठी ८६०५४२२८८८, पिंपळे सौदागरसाठी ७८८७८६८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले आहे. परंतु अशा व्यक्तींना घरपोच जेवण देणे अथवा न देण्याचे अधिकार संबंधित संस्थेचे असल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२० पासून घरपोच मोफत भोजन पुरविण्याची सुविेधा कार्यान्वित होणार आहे. या गरजू नागरिकांना मोफत भोजन देण्यात येणार असल्याने यासाठी दानशूर व्यक्ती अथवा संस्था यांचेकडून शिधा किंवा तयार जेवण दान स्वरूपात सदर संस्थाकडून स्विकारण्यात येणार असून दानशूर व्यक्ती अथवा संस्था यांनी ९३७२९३७५९८ ओंकार गौरीधर, ८८०५९८८९७१ शार्दूल पेंढारकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात येत आहे.













