न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Corona Patient death ratio in Maharashtra). राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही २.५ ते ३ टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र, मृतांचा आकडा ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
या आकडेवारीने महाराष्ट्रातील नागरिकांची धाकधूक काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्वतः राजेश टोपे यांनी महाराष्ट्र कोरोनावर नक्कीच विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृतांचीही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत मोठी आहे. याबाबत आज बैठक घेवून डॉक्टरांची हाय पावर समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का, याबाबत ही समिती अभ्यास करेल.’













