न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- भोसरीतील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने महावीर जयंतीच्या निमीत्ताने अन्नदान करण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने घरीच साजरा करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
जैन श्रावक संघाच्या वतीने सुमारे एक हजार गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी जैन संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, माजी अध्यक्ष मदन कर्नावट, सागर सांखला, राजेंद्र चोरडीया, विजय कर्नावट, गिरीश मुथियान, डॉ. प्रदीप गांधी, डॉ.भाळगट, सुभाष डुंगरवाल, भागचंद गुगळे, संजय भंडारी, मनोज गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक सागर गवळी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.













