- ‘चीफ मिनिस्टर रिलीफ फंडास’ केली पंचवीस हजारांची आर्थिक मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- कोवीड-१९ च्या संसर्गामुळे देशात आणि जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र या उपाययोजना राबवताना आर्थिक मदतीची गरज असल्याने, कुठल्याही आपत्तीत मदतीसाठी पुढे येणारे बांधकाम क्षेत्रातले अग्रणी नाव ‘मोरया असोसिएट’ ने संकटात सापडलेल्या समाजासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
या उद्योग समूहाचे अध्यक्ष ‘ज्ञानेश्वर कडू ’ यांनी पंचवीस हजार रुपये मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हा निधी ‘चीफ मिनिस्टर रिलीफ फंड कोविड १९’ यास ऑनलाईन ट्रान्स्फर केला असल्याची माहिती कडू यांनी दिली. तसेच नागरिकांनी तोंडावर मास्क परिधान करावा. घरातून बाहेर पडू नये. शासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचे पालन करावे, असे आवाहनदेखील कडू यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.













