न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- आरोपीने त्याच्या एमएच १४ / ई एस ९७३२ या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून गावठी हातभट्टीची दारु वाहून नेली. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्या डिक्कीतून ३० प्लास्टिकच्या पिशव्यांमधून तीनशे रुपये किमतीची तीन लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. ही कारवाई बोपोडी रोड, दापोडी येथे बुधवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.
तेजस उर्फ सागर संजय गायकवाड (वय २४, रा. बोपोडी), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण अशोक शिंदे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












