न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात ६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण आकडा २४ वर पोहोचला आहे.
सकाळी ३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. त्यानंतर संध्याकाळी ससून रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.












