न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
याकामी पुढीलप्रमाणे भाग सील करण्यात आले आहेत :-
घरकुल रेसीडेन्सी – बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली. (पवार इंडीस्ट्रीयल परीसर – नेवाळे वस्ती )
जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परीसर, पिंपरी (गिरमे हॉस्पीटल – अग्रेसन लायब्ररी – क्रिना ट्रेडर्स – चैताली पार्क हौसिंग सोसायटी – खराळआई गार्डन – ओम हॉस्पीटल – ओरीयंटल बैंक – सीटी प्राईड हॉटल – क्रिस्टल कोर्ट हॉटल – गिरमे हॉस्पीटल )
कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी , भोसरी ( रोडे हॉस्पीटल – एसव्हीएस कॉम्प्युटर – स्वरा गिष्ट शॉपी – साई मंदीर रोड – अनुष्का ऑप्टीकल शॉप – रोडे हॉस्पीटल),
शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव ( शिरोळे क्लिनिक – गणेश मंदीर – निदान क्लिनिक – किर्ती मेडीकल – रेहमानिया मस्जिद – ऑर्कीड हॉस्पीटल – अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक )
हा भाग दि. ०८ एप्रिल, २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात आलेली असून सदरील भागातील सरकारी व खाजगी बँकांच्या शाखा बंद राहतील केवळ ए. टी. एम. केंद्रांची सुविधा कार्यान्वीत राहील.













