न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत आज नवीन ०३ ने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १२ झालेली आहे. त्यात सकाळी एका महिलेचा समावेश होता. आज रात्री हाती आलेल्या वृतानुसार त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. एक पुरुष व एक महिले या दोघांचा यात समावेश आहे. त्यामुळे शहरामध्ये आजपर्यंत एकूण २४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १२ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांनी आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच रहावे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात नागरिकांची आजपर्यंतची संख्या १८८७ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. या आदेशाचे उल्लघन करणा – यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि. ०९ / ०४ / २०२० पर्यंत एकुण ६२७ व्यक्तींचे कोरोना ( कोविड १९ ) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ५६५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि. ०९ / ०४ / २०२० रोजी एकुण ४० व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना ( कोविड १९ ) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या १६० कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि. ०९ / ०४ / २०२० अखेर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील ७७५६७० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आजपर्यंत १८८७ व्यक्तींना परातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा – या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखा लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालय याठिकाणी स्वतंत्र बाहय रुग्ण विभाग कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना त्यांचे रुग्णालया बाहेरील स्वतंत्र मोकळया हवेशीर ठिकाणी सर्दी, ताप, खोकला असणा – या रुग्णांसाठी वेगळा बाहयरुग्ण विभाग उभारण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे.












