न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- लॉकडाउनमध्ये कोरोणा विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याने व कोरोना विषाणूचा संसर्ग होउ नये म्हणुन शाळा बंद असल्या तरी चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना घरबसल्या शिक्षण घेता यावे यासाठी व्हर्च्युअलई-लर्निग च्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला जात आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वर्ष वाया जात नसल्याचे प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले. सध्या जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असुन पुर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवडकडून विद्यार्थ्यासाठी घरीच रहा, सुरक्षित रहा असा संदेश देत आहे. त्याच बरोबर मुलांचे शैक्षनिक नुकसान टाळले जात आहे.
विद्यार्थी व्हर्च्युअल लर्निगद्वारे शाळेचा सगळा अनुभव घेत आहेत. या उपक्रमास शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षक विशेष शैलीने विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहे. त्यातच विद्यार्थ्यांना आपले शिक्षक व वर्गमित्र यांच्यासोबत संवाद साधला जात आहे. विदयार्थी खेळीमेळीने शिक्षणाचा आनंद घेत आहेत.











