न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने परदेशातून शहरात आलेले, त्यांच्या हाय’ आणि ‘लो रिस्क’ कॉन्टॅक्टमधील अशा दोन हजार ४८ नागरिकांना आजपर्यंत ‘क्वारंटाईन’ केले होते.
त्यातील ४१४ जणांचा २८ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी होता. परंतु, २१ दिवसानंतरही लक्षणे येताना दिसून आली. त्यामुळे क्वारंटाईनचा कालावधी वाढवून २८ दिवसांचा केला आहे.
त्यांची दोनवेळा तपासणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यातील काहीजण घरीच होते. लॉकडाऊन असल्याने त्यांना घरीच राहावे लागणार आहे. परंतु, त्यांच्यावर होम क्वारंटाईनची आवश्यकता नाही, असे महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.















