न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. ९ ) रोजी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका ४१ वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट शनिवारी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. आता या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार महिलांचे रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे
पिंपरी-चिंचवड शहरात (रविवारी) एकाच दिवशी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दुपारी एकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. तर, शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार महिलांचे रिपोर्ट आता आले असून ते पॉझिटिव्ह आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २२ झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.















