न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- भारतरत्न डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती च्या औचित्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी कोराना पासून बचाव कार्यासाठी मदत निधी द्यावा, असे आवाहन पिंपरी चिचंवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.
“पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘महामानव अभिवादन निधी’
उभारला जात आहे. या द्वारे आपण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मदत निधी खात्यामध्ये जेवढी शक्य असेल तेवढी मदत ऑनलाइन पेमेंटस् द्वारे पाठवावी, जेणेकरुन देशापूढील आजच्या या मोठ्या समस्येच्या काळात जनसामान्यांना व गरजूनां आवश्यक ती मदत होईल व याप्रकारे आपण महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना या मानवसेवा कार्याद्वारे खरे अभिवादन करून त्यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणेच आचरण करू या.” असे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मदत निधी खाते क्रमांक पुढीलप्रमाणे:-
A/C Name : MAHARASHTRA STATE YOUTH CONGRESS
Bank : Union Bank
A/C No. :- 322501010033629
IFSC Code: UBIN0532258
Branch : Ghulewadi, Sangamner


















