न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदीच्या काळात वाकड पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार बिभीषण कन्हेरकर यांना माहिती मिळाली की, घरफोडी आणि वाहनचोरी करणारा एक अल्पवयीन चोरटा डी मार्ट येथे येथे दुचाकीवरून फिरत आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८३ हजार रुपयांच्या चोरीचे दागिने आणि तीन दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील एक असे चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन चोरट्यावर यापूर्वी १३ गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.















