न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- निगडीतील ओटास्कीम मध्ये करोना रुग्ण आढळल्याने परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या गल्लीत येणारा रस्ता बंद केला. त्या कारणावरून आरोपींनी वाद घातला.
मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या रोहित ताठे, विजू साळवे, नीता ताठे, सिंधू साळवे, चंदा साळवे, प्रशांत सूर्यवंशी यांना आरोपींनी मारहाण केली. तसेच विजू साळवे याच्यावर तलवार व कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले.
ही घटना निगडी येथे शनिवारी (दि. २५) सायंकाळी घडली. रोहित रामदास ताठे (वय २४, रा. भीमशक्ती, चौक, निगडी) यानी रविवारी (दि. २६) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संपत घागरमळे, दिलीप दगळगे, अभिजित मांजरे, सुनील कांबळे, अक्षय वावळे, अशोक वावळे, आकाश वावळे, अजय वावळे, तीक मांजरे, रवी साठे, अवि अवचार (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.


















