- स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- आज संपूर्ण जगभरात कोरोना (COVID 19) या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. आपल्या देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.
या दरम्यान च्या काळात महाराष्ट्र राज्यातील नागरिक, ज्यांचे हातावरचे पोट आहे, असे दारिद्रयरेषेखालील लोक, जे असंघटीत कामगार नोंदणीत नाहीत, अशा लोकांचा कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासुन रोजगार, व्यवसाय, धंदा बंद आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवडसह राज्यातील अशा नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे विज बिलं माफ करावीत, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ ह ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















