न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- काळेवाडी मशिदीसमोर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना एक दिसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास युनूस गुलाब अवतरणार ( वय ५० ) , मतीन युनूस अवतरणार ( वय २८ ) , मोईन युनूस अवतरणार ( वय २४ , सर्व रा . भारत माता चौक , काळेवाडी ) या आरोपींनी वाद घातला.
आरोपी युनूस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हातातील काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपरी न्यायालयाने तीनही आरोपींना एक दिसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.












