न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून प्रसून कुमार झा (वय २८, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) हे कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.











