न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. सोमवारी ( दि. ४ ) पिंपरी चिंचवडमध्ये १३८ जणांवर भारतीय दंड विधान १८८ नुसार कारवाई करण्यात आली. पिंपरी – चिंचवड शहरात २१ ” भागात कंटेन्मेंट झोन ( प्रतिबंधित क्षेत्र ) । तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत.
अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. सोमवारी शासनाने कंटेन्मेंट ( झोन वगळता इतर भागांत दारूची कि दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. यामुळे तळीरामांना काहीसा दिलासा मिळाला.
सोमवारी शहरात ठिकठिकाणी तळीरामांच्या रांगा आढळून आल्या. लॉकडाऊनच्या काळात घडलेला मदिरेचा उपवास आता सुटणार या आशेने हे तळीराम दारूच्या दुकानांसमोर सकाळपासूनच घिरट्या घालत होते. काही ठिकाणी नियमात राहून दारूची खरेदी – विक्री झाली. पण, काही ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून तळीरामांनी सोशल डिस्टन्स राखण्याला हरताळ फासला. त्यामुळे पोलिसांना अशी दुकाने बंद करावी लागली.
सोमवारी पिंपरी – चिंचवड आयुक्तायातील भोसरी ( १० ) , पिंपरी ( ८ ) , चिंचवड ( १८ ) , निगडी ( १४ ) , आळंदी ( ८ ) , चाकण ( ११ ) , दिघी ( ४ ) , सांगवी ( ६ ) , वाकड ( ६ ) , हिंजवडी ( १८ ) , देहूरोड ( ११ ) , तळेगाव दाभाडे ( ६ ) , चिखली ( १६ ) , रावेत चौकी ( १ ) , शिरगाव ( १ ) असे एकूण १३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


















