न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर राहल जाधव यांच्या वतीने चिखली, जाधववाडी परिसरातील नागरिकांना दररोज अन्नदान करण्यात येत आहे. चिखली, जाधववाडी परिसरात परप्रांतीय कामगार वर्ग जास्त आहे. तरी प्रभागातील जनतेवर उपासी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी राहुलदादा जाधव स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे.
आत्तापर्यंत प्रभागातील जनतेसाठी किराणा साहित्य, भाजीपाला, जंतुनाशक औषध फवारणी अशा प्रकारच्या विविध सेवा प्रभागातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या आहेत. तसेच प्रभागातील जनतेची मोफत आरोग्य तपासणी केली.
या उपक्रमाबाबत बोलताना जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामधील एकही नागरिक उपाशी राहणार नाही. यासाठी योग्य ते नियाजन करण्यात येत आहे. कार्यकत्यांच्या सहकार्यामुळे शक्य आहे. तसेच जोपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत जनसेवा अशीच चालू राहील. तसेच लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले.


















