न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- बोपोडी येथील खासगी रूग्णालयात एका तरुणास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्या तरुणाने रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विरेंद्र चंद्रकांत जक्कल वय २४ रा. खडकी असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत विरेंद्र चंद्रकांत जक्कल याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे बोपोडी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्याला नेमका कोणता आजार होता याचे रिपोर्ट येणे बाकी होते.
मात्र मनात त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याच दरम्यान बाथरूमला जायच, असे सांगून विरेंद्रने रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप रिपोर्ट न आल्यामुळे त्याला नेमका कोणता आजार होता हे कळू शकलेले नाही.














