- शहरातील मोशी, चऱ्होली, रुपीनगर, संभाजीनगरमधील सहाजण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात दोन पुरुषांचा आणि चार स्रियांचा समावेश आहे. पुरुषांची वयं अनुक्रमे ३६ आणि ५० वर्षे अशी असून महिलांची वयं अनुक्रमे १९,२५,३३,६३ वर्षे अशी आहेत.
हे सर्व रुग्ण दिघी, विकासनगर किवळे, आनंदनगर, मोरेवस्ती, चिखली परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०४ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात ६४ रुग्ण उपचार घेत आहेत.
तसेच आज मोशी, चऱ्होली, रुपीनगर, संभाजीनगर येथील सहा जणांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत १२५ वर पोहोचली आहे.


















