न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- एका महिलेने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, सोमवारी (दि. १८) रोजी दुपारी चिखलीतील सोनवणेवस्ती येथे उघडकीस आली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
गौरव गणेश गाढवे (वय ७, रा. शिवकृपा कॉलनी, त्रिवेणीनगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. रुपाली गणेश गाढवे (वय ४०), गंधर्व गणेश गाढवे (वय ५) या दोघांना नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गाढवे या महिलेने आपल्या गौरव आणि गंधर्व या दोन चिमुरड्यांना घेऊन सोनवणे वस्ती, चिखली येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित विहिरीकडे धाव घेतली. नागरिकांनी त्या तिघांनाही त्वरित पाण्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “मी नाराज आहे. माझी घुसमट होत आहे. एवढेच रुपाली पोलिसांना सांगत आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.















