- इंदिरानगर, मोशी, रुपीनगर, संभाजीनगर, गणेशनगर, मधुबन सोसायटी परिसरातील सहाजण कोरोनामुक्त…
- आज मध्यरात्रीपासून दिघी, मोरेवस्ती, भाटनगर,रहाटणी, भोसरीतील परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने अडीच महिन्यात सव्वा दोनशेचा आकडा पार केला आहे. महापालिकेने रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज सायंकाळी आला असून त्यात, आज आनंदनगर येथील १७ रुग्णांसह इतर ठिकाणच्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आज शहरात तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.
आज ११ पुरुषांना व ११ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुणे व नवी मुंबईतील एका पुरुषाला व एका महिलेला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण रहाटणी, भाटनगर, भोसरी, आनंदनगर, दिघी येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे आजअखेर २२६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात ८० जण उपचारासाठी दाखल आहेत.
दरम्यान आज इंदिरानगर चिंचवड, मोशी, रुपीनगर, संभाजीनगर, गणेशनगर तळवडे, मधुबन सोसायटी, सांगवी येथील रहिवासी असलेल्या सहा कोविड – १९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३१ वर पोहोचली आहे.
आज दिघीतील अमृतधारा येथील (विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर – अर्जुन जिम – ओयो होम – जेनेसिस च-होली समोर – आळंदी रोड – ममता स्वीट्स विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर),
चिखली, मोरेवस्ती येथील (ओम मिनी मार्केट – अष्टविनायक चौक – एक्सीस बँक एटीम – तुषार पान सेंटर समोर – बिस्मिला चिकन शॉप समोर – कल्पना दुर्स एण्ड ट्रॅव्हल्स – ओम मिनी मार्केट),
पिंपरीतील भाटनगर, येथील (किर्वे टेलर समोर – रेल्वे लाईन – राधिका अपार्टमेंट – रेल्वे लाईन – डायमंड स्पोर्टस – लिंक रोड – किर्वे टेलर समोर),
रहाटणीतील ज्ञानगंगा सोसायटी, (श्री टी स्पॉट- निर्मल बंगला – आर.आर.जी. सोसायटी रोड – रॉयल रहार्डका ग्रीन फेज २ – रॉयल ऑरेंज कांऊटी रोड – ज्ञानगंगा सोसायटी रोड – श्री गार्डन टी स्पॉट)
भोसरीतील हनुमान कॉलनी येथील फेन्सि कम्प्युटर पेरिफेरल्स – दुर्गामाता मंदिर – राजगुरु बैंक समोर – फैन्सी कम्प्यूटर पेरिफेरल)
हे परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून कन्टेनमेंट झोन घोषीत करुन, पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेले आहेत. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.















