न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) : दापोडीमध्ये परदेशी यांचे राजा वाइन्स नावाने दारूचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आपले दुकान बंद करून ते घरी गेले. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी दुकानाच्या भिंतींमधील जाळी कशाच्या तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. दुकानातील ७२ हजार ८५७ रुपये किमतीच्या विविध विदेशी ब्रँडच्या दारूच्या ४८ बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. २०) रोजी उघडकीस आली. मनोज शंकरलाल परदेशी (वय ४५, रा. नेहरू चौक, दापोडी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















