न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) : पिंपरी चिंचवड शहर मनसेने कोविड-१९ लॉकडाउन परिस्थितीत रस्त्यावर उभे राहून, नागरिकांना सुरक्षा पुरविणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पोलिस बांधवांच्या कार्याला सलाम ठोकीत, त्यांची कोरोनापासून सुरक्षा व्हावी यासाठी पाऊले उचलली आहेत.
शहर मनसे ने पोलीस बांधवांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत व्हावी, यासाठी सांगवी पोलीस स्टेशन आणि भोसरीतील वाहतूक विभागास भेट देऊन पोलिसांना सॅनिटायझर स्टँडचे व सॅनिटीझरचे वाटप करून आभारपत्र प्रदान केले.
यावेळी शहर मनसे उपाध्यक्ष राजू साळवे, उप विभागप्रमुख अलेक्सझांंडर आप्पा मोझेस, दिलीप ठोंबरे, प्रशांत सांगळे, सागर भोकरे, सतीश मथमर्थी आदी उपस्थित होते.















