- महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांची एमएसईबीकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड ही औद्योगिक तसेच कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे तसेच कोरोना आजारास अटकाव करण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देश लॉक डाऊन केलेला आहे.
तसेच सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी जाहीर करुन उद्योगधंदे सध्या बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ब-याच गोरगरीब, कष्टकरी, कामगार, खाजगी नोकरदार खाजगी नोकरी, व्यवसायिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर इ. वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे. तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे.
तरी सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची खालावलेली आर्थिक स्थिती विचारात घेऊन वीज कनेक्शन खंडित न करता नागरिकांना वीज बील टप्याटप्याने भरण्यासाठी सवलत देणेबाबतचे पत्र महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित पुणे यांना दिले आहे.