न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- मनपा मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल साठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती (इसिए) च्या पुढाकाराने युनायटेड वे, दिल्ली आणि वरपूल संस्थेच्या वतीने अंदाजे ५ लाख पेक्षा जास्त रकमेचे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य महापालिकेस सुपुर्द करण्यात आले.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कंपनीचे संतोष मोरे आणि राजेंद्र जानराव, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, संजीविनी मुळे, विनिता दाते, हिरामण भुजबळ, निळकंठ पोमण, विजय वावरे आदी उपस्थित होते .
महापालिकेस साहित्य खालील देण्यात आले..
1. ट्रिपल लेयर मास्क -2000 नग
2. युरो ग्रेड मास्क – 250 नग
3.हॅन्ड ग्लोव्हज – 2000 नग
4. पी पी ई किट – 400
5.हॅन्डवाॅश -130 Lts
6. सॅनिटायझर – 130 Lt.
7. थर्मामीटर – 3 no.


















