- आज च-होली, यमुनानगर, भोसरी, सांगवीतील नऊजण कोरोनामुक्त…
- दापोडी, चिखली, रहाटणी, भोसरीतील परिसर मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शक्रवारी रात्री सात वाजता हाती आलेल्या अहवालानुसार तब्बल अकरा जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात सहा पुरुषांचा आणि पाच महिलांचा समावेश आहे. आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण चिखली, भोसरी, आनंदनगर, रहाटणी, काळेवाडी, दापोडी येथील रहिवासी आहेत. यात पुण्यामधील येरवड्यातील एका महिलाचा देखील समावेश आहे. दरम्यान शहरातील सकारात्मक कोरोनाबाधीतांची संख्या २६५ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
तसेच आज च-होली, यमुनानगर, भोसरी, सांगवी व नानपेठ, पुणे येथील रहिवासी असलेले नऊ कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६० वर पोहोचली आहे.
आज दापोडीतील बॉम्बे कॉलनी परिसरातील जामा मशिद – कृष्णाई डेअरी – महादेव मंदिर – विठ्ठल तरुण मंडळ दापोडी गावठाण – जामा मशिद दापोडी, चिखलीतील डेस्टिनेशन मेमोइर- डेस्टिनेशन मेमोइर सोसायटी हद्द भिंत – फिनो कॉर्नर – क्रिस्टल कॉर्नर – डेस्टिनेशन मेमोइर सोसायटी हद्द भिंत,
रहाटणीतील शिवराजनगर- गणपती मंदिर – रॉयल ऑरेंज कौंटी सोसायटी – आकाशगंगा फेज -२ – कुणाल मेडिकल आणि आयुर्वेद – भाग्यलक्ष्मी स्टेशनरी – श्रीराम सुपर मार्केट – वेलकम किराणा स्टोअर्स – गणपती मंदिर,
भोसरीतील धावडेवस्तीतील गोविंदा सुपर मार्केट – कृष्णा कार डेकोर – वर्षा सिलेक्शन – रिझवान चिकन सेंटर – ज्ञानेश्वरी लेडीज टेलर्स – शुभम मोबाईल शॉपी – भैरवनाथ शाळा – गोविंदा सुपर मार्केट.
हा परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून कंन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.