न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेला पिंपरीगावातून कॅम्पकडे जाणारा रस्ता तसेच साई चौकातून पुणे – मुंबई महामार्गाकडे जाणारा अंडरपास आजपासूनखुला करण्यात आला आहे.
पिंपरी गावातून कॅम्पमध्ये ये – जा करण्यासाठी तपोवन मंदिर रस्त्याचा वापर केला जातो; मात्र या ठिकाणी राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली; तसेच त्याच्या कुटुंबातील लोकांनाही क्वारंटाईन केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे पिंपळे सौदागर, पिंपरी गावातील लोकांना कॅम्पमध्ये जाताना अशोक थिएटर रस्त्याने जावे लागत होते.
पिंपरीतील साई चौकातून पुणे मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी साई चौकातील अंडरपास हा शॉर्टकट मानला जातो. त्यामुळे महपालिकेने रस्ता खुला केल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.