न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- हॉर्न वाजवू नको अशी विनंती करणाऱ्या गुन्हे शाखेच्या एका पोलिसाला दुचाकीस्वाराने कानशिलात लगावल्याची घटना कुदळवाडीजवळ घडली. हा प्रकार मंगळवारी (दि. २६) रात्री ८ वाजता केएसबी चौकाकडून कुदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. याप्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
सुमित माणिक देशमुख (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.