न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- येरवडा भागातील शादलबाबा चौकाच्या इथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेला कैदी नितीन शिवाजी कसबे (वय २४ रा.येरवडा) हा चारजणांसोबत पायी चालत जात होता. त्याच दरम्यान कुणाल चांदणे आणि आकाश कानचिले याच्यासह दहा ते १२ जणांनी नितीनवर कोयत्याने हल्ला केला.
यामध्ये नितीन गंभीर जखमी झाला. त्यानंतर तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी ५ ते ६ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी माहिती दिली. तसेच नितीन शिवाजी कसबे आणि कुणाल चांदणे, आकाश कानचिले यांच्यात पूर्वी देखील भांडणे झाली होती.