न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- चिंचवडगाव येथील भाजी मंडई बुधवारपासून सुरू होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी आदेश काढला. चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ, उपाध्यक्ष सागर गरुड आदींनी महापालिका प्रशासनाकडे भाजीमंडई पुन्हा सुरू करण्यासाठी पासची मागणी करणारे पत्र दिले होते.
त्यानुसार सर्व बाबीचा विचार करून प्रशासनाने त्यांना ३० जूनपर्यंत अटी, शर्तीवर भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली. मंडईत एकूण ४८ गाळे आहेत. हे गाळे सम – विषम पद्धतीने सुरू राहतील. प्रवेशद्वारावर ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अत्यावश्यक असून शरीराचे तापमानाचे मोजमाप आवश्यक आहे. ग्राहकांना मंडईच्या एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जाता येणार आहे.