न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने उद्योजक महेश बारणे यांच्या वतीने थेरगाव, टाकवेतील अपंग, कामगार, गरजूंना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
‘मदत नव्हे कर्तव्य ‘ या उपक्रमांतर्गत गोर-गरिबांना गहू, तांदूळ, तेल, मीठ, मिरची या जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे नुकतेच वाटप करण्यात आले. या संकटाच्या प्रसंगात कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे, अशी माहिती बारणे यांनी दिली.