न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंचाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. स्थानिक नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या वतीने प्रभागातील तळवडे, सहयोग नगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर येथील जेष्ठ नागरिकांना व १३० महिला बचत गटातील महिलांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथिक गोळ्या, सॅनिटायझर व गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथिक गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावशाली असून ‘कोरोना’ सारख्या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर याचे सेवन करणे फायदेशीर ठरणार आहे. याविषयी, आयुष मंत्रालयातर्फेसुद्धा या गोळ्यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, तसेच त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या हेतूने नगरसेवक प्रविण भालेकर यांनी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप सुरू केले आहे. या गोळ्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून घेऊन जाव्यात असे आवाहन भालेकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत पतंगे, गेनभाऊ पाटोळे, लक्ष्मण गुरसाळी, रविंद्र जंगम, सावता फरांदे, बुरूटे काका, सुमन कांबळी यांच्यासह रूपीनगर, तळवडे परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.