न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- डाॅ. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम पासून अंतिम वर्षा पर्यंतच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर एन एस यू आय (नॅशनल स्टूंडस् युनियन आॅफ इंडीया) च्या वतीने आज निवेदनाद्वारे विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली.
‘प्रथम सुरक्षा नतंर परिक्षा’ अशी बहुतांश विद्यार्थ्यांची मागणी आहे व सुरक्षेची संपूर्ण हमी नाही तर परिक्षा नकोच या बाबत चे निवेदन आज विद्यापीठ कार्यालयात ॲड.संदीप राणे (कायदेशीर सल्लागार, डाॅ डी वाय पाटील विद्यापीठ) यांना देण्यात आले.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डाॅ. वसीम ईनामदार व पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव हे उपस्थित होते.


















