न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोविड १९ या विषाणूचा सामना करण्याकामी मुख्यमंत्री निधीस आर्थिक सहाय्य म्हणून महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करून एकत्रित झालेली रक्कम रुपये १,१०,६४,९००/- (एक कोटी दहा लाख ६४ हजार ९०० रुपये) चा धनादेश आज शनिवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
त्यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रियाताई सुरगुडे, कोषपाल अविनाश ढमाले, चिटणीस योगेश रसाळ, सहसचिव बाळासाहेब कापसे, प्रमुख संघटक गोरख भालेकर, संघटक धनाजी नखाते, कार्यकारिणी सदस्य सुरेश गारगोटे, अमित जाधव, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोने, योगेश वंजारे, सुभाष लांडे, नवनाथ शिंदे, रणजीत भोसले, शुभांगी चव्हाण, बाळासाहेब साठे, मिलिंद काटे, अनिल राऊत, रवी रोकडे तसेच कस्ट्राईब एकता संघटनेचे अध्यक्ष गणेश भोसले, कामगार प्रतिनिधी उद्धवजी डवरी व नरेंद्र शेडगे इत्यादी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना महापालिकेतील कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार आज ही आर्थिक मदत मुख्यमंत्री निधीस करण्यात आली.