न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- चाकण येथील एकाच कंपनीत सात जण करोना पॉझिटिव्ह सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण आहे. यातील एकजण कडूस येथील आहे. याशिवाय आळंदी येथे एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्याने खेड तालुक्यातील बाधित रुग्णांची चाकरसंख्या ४१ वर गेली आहे.
पोकलँड बनवणाऱ्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या सात कंपनी कामगारांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकण एमआयडीसीतील कंपन्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत चाकणमध्ये ९ कामगारांना करोनाची लागण झाली आहे. कामगार कंपनीत राहून काम करत होते; मात्र प्रत्यक्षात त्यांनी पुणे, पिंपरी येथून ये – जा केली होती. त्यामुळे लागण झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.