- मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी देणार प्रख्यात वकील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपळे सौदागर येथे प्रेमप्रकरणातून विराजचा ७ जून रोजी सहा जणांनी खून केला. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली. अनेक राजकीय नेत्यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
रविवारी (दि. १४) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विराजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाबाबत माहिती घेतली. विराज याच्या कुटुंबीयांनीही पोलीस तपासाबाबत समाधानी असल्याचे पवार यांना सांगितले. आपण पोलीस आयुक्त यांच्याशी तपासाबाबत बोललो आहे. तपास योग्य दिशेने सुरु आहे. विराज याच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कोणता वकील पाहिजे, अशी विचारणा पवार यांनी जगताप कुटुंबीयांकडे केली. आपल्याला पाहिजे असलेल्या काही वकिलांची नावे दया शासन तो वकील आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन उपमख्यमंत्री पवार यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, अशोक शीलवंत यावेळी उपस्थित होते.