न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीत नगरसेवक रोहित काटे यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवारी दुपारी १:१५ वाजता आग लागली होती. तेथील कार्यकर्त्यांनी अग्निशामक विभागास कळविले. मात्र. अग्निशामक विभागाचे वाहन पोहोचण्याआधीच येथील लोकांनी बहुतांशी आग आटोक्यात आणली होती.
अग्निशामक विभागाचे दोन वाहनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उर्वरित आग आटोक्यात आणली. आगीचे कारण आणि आगीत झालेल्या नुकसानीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.