न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22. जून. 2020) :- लडाखमधिल गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील वीस जवानांना वीरमरण आले.
चिनच्या या हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने प्राधिकरणातील भेळ चौकात रविवारी सायंकाळी चिनी वस्तुंची होळी करून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर आर.एस. कुमार, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शिनकर, भाजपा पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सलीम शिकलगार, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अनुप मोरे, भाजपा शहर चिटणीस माणिक फडतरे, भाजपा शहरउपाध्यक्ष राजेंद्र बाबर यांची उपस्थिती होती.