भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जून 2020) :- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मनपा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व यंत्रणांची क्षमता पाहता कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात लवकरात लवकर येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थिती संदर्भात महापालिका आयुक्तांनी त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पालिकेचे स्वि. नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. मनपाच्या यंत्रणेची संपूर्ण क्षमता पाहता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात किमान सात ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाउन करावा तरच परिस्थितीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.


















