न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता (काका) साने यांचे कोरोनामुळे दुखःद निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा हाय रिस्क संपर्कातील नागरिकांशी संबंध आला होता.
२५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.












