- त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले – महापौर ढोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय (काका) साने, वय ४८ वर्षे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा स्वाब दिनांक २२.०६.२०२० रोजी घेण्यात आला होता.
तर सकारात्मक अहवाल २४.०६.२०२० रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया, उच्च रक्तदाब, आधीचा आजार व मधुमेह असल्याने त्यांवर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना आज सकाळी ५.३९ वाजता आदित्य बिर्ला रूग्णालयात निधन झाले.
लाॅकडाऊन कालावधीत नागरिकांची सेवा करताना त्यांना लागण झाली होती. त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याची भावना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.
शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतांना महापौर माई ढोरे म्हणाल्या, श्री साने यांनी नागरिकांच्या हितासाठी अनेक विषय महापालिकेच्या सभागृहात मांडले होते.












