न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२०) :- लॉकडाऊनमुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असणारी पीएमपीची सेवा शहरात ऑगस्ट महिन्यापासून सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी पीएमपी प्रशासनाकडून १३ डेपोंच्या मॅनेजरची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डेपो प्रमुखांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात कंटेन्मेंट भाग वगळता २६ मे पासून पीएमपीची सेवा सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात महापालिकेने परवानगी दिल्यास कंटेन्मेंट झोन वगळता शहरातील ५० मार्गावर बस सोडण्याचे नियोजन पीएमपीतर्फे करण्यात आले आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सूचना दिल्यास अंतिम निर्णय घेण्यात येतील, असेही पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.












